तुकाराम गाथा - अभंग ७७

प्रकाशन: संपादक मंडळ | ३० ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ७७ | Tukaram Gatha - Abhang 77

तुकाराम गाथा अभंग ७७ - [Tukaram Gatha - Abhang 77] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

देखोनि हरखली अंड ।
पुत्र जाला म्हणे रांड ।
तंव तो जाला भांड ।
चाहाड चोर शिंदळ ॥१॥

जाय तिकडे पीडी लोकां ।
जोडी भांडवल थुंका ।
थोर जाला चुका ।
वर कां नाहीं घातली ॥ध्रु॥

भूमि कांपे त्याच्या भारें ।
कुंभपाकाचीं शरीरें ।
निष्टुर उत्तरें ।
पापदृष्टी मळीणचित्त ॥२॥

दुराचारी तो चांडाळ ।
पाप सांगातें विटाळ ।
तुका म्हणे खळ ।
म्हणोनियां निषद्धि तो ॥३॥संत तुकाराम महाराज