तुकाराम गाथा - अभंग ७६

प्रकाशन: संपादक मंडळ | २९ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ७६ | Tukaram Gatha - Abhang 76

तुकाराम गाथा अभंग ७६ - [Tukaram Gatha - Abhang 76] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

श्वान शीघ्रकोपी ।
आपणा घातकर पापी ॥१॥

नाहीं भीड आणि धीर ।
उपदेश न जिरे क्षीर ॥ध्रु॥

माणसांसि भुंके ।
विजातीनें द्यावे थुंके ॥२॥

तुका म्हणे चित्त ।
मळीण करा तें फजीत ॥३॥संत तुकाराम महाराज