तुकाराम गाथा - अभंग ७५

प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ७५ | Tukaram Gatha - Abhang 75

तुकाराम गाथा अभंग ७५ - [Tukaram Gatha - Abhang 75] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

आहाकटा त्याचे करिती पितर ।
वंशीं दुराचार पुत्र जाला ॥१॥

गळेचि ना गर्भ नव्हेचि कां वांज ।
माता त्याची लाजलावा पापी ॥ध्रु॥

परपीडें परद्वारीं सावधान ।
सादरचि मन अभाग्याचें ॥२॥

न मळितां निंदा चाहडी उपवास ।
संग्रहाचे दोष सकळ ही ॥३॥

परउपकार पुण्य त्या वावडें ।
विषाचें तें कीडें दुग्धीं मरे ॥४॥

तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति ।
दया क्षमा शांति नातळे त्या ॥५॥संत तुकाराम महाराज