तुकाराम गाथा - अभंग ७३

प्रकाशन: संपादक मंडळ | २६ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ७३ | Tukaram Gatha - Abhang 73

तुकाराम गाथा अभंग ७३ - [Tukaram Gatha - Abhang 73] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

नव्हे आराणूक संवसारा हातीं ।
सर्वकाळ चित्तीं हाचि धंदा ॥१॥

देवधर्म सांदीं पडिला सकळ ।
विषयीं गोंधळ गाजतसे ॥ध्रु॥

रात्रि दीस न पुरे कुटुंबाचें समाधान ।
दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥२॥

तुका म्हणे आत्महत्या रे घातकी ।
थोर होते चुकी नारायणीं ॥३॥संत तुकाराम महाराज