तुकाराम गाथा - अभंग ७२

प्रकाशन: संपादक मंडळ | २५ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ७२ | Tukaram Gatha - Abhang 72

तुकाराम गाथा अभंग ७२ - [Tukaram Gatha - Abhang 72] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

एकादशीव्रत सोमवार न करिती ।
कोण त्यांची गति होईल नेणों ॥१॥

काय करूं बहु वाटे तळमळ ।
आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ध्रु॥

हरिहरां नाहीं बोटभरी वाती ।
कोण त्यांची गति होईल नेणों ॥२॥

तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति ।
कोण त्यांची गति होईल नेणों ॥३॥संत तुकाराम महाराज