तुकाराम गाथा - अभंग ७१

प्रकाशन: संपादक मंडळ | २४ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ७१ | Tukaram Gatha - Abhang 71

तुकाराम गाथा अभंग ७१ - [Tukaram Gatha - Abhang 71] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

करावी ते पूजा मनेंचि उत्तम ।
लौकिकाचें काम काय असे ॥१॥

कळावें तयासि कळे अंतरींचें ।
कारण तें साचें साचा अंगीं ॥ध्रु॥

अतिशया अंतीं लाभ किंवा घात ।
फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥२॥

तुका म्हणे जेणें राहे समाधान ।
ऐसें तें भजन पार पावी ॥३॥संत तुकाराम महाराज