तुकाराम गाथा - अभंग ७०

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ७० | Tukaram Gatha - Abhang 70

तुकाराम गाथा अभंग ७० - [Tukaram Gatha - Abhang 70] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

ढेकरें जेवण दिसे साचें ।
नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥१॥

हे ही बोल ते ही बोल ।
कोरडे फोल रुचिविण ॥ध्रु॥

गव्हांचिया होती परी ।
फके वरी खाऊं नये ॥२॥

तुकां म्हणे असे हातींचें कांकण ।
तयासी दर्पण विल्हाळक ॥३॥संत तुकाराम महाराज