तुकाराम गाथा - अभंग ७

प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जून २००५

तुकाराम गाथा - अभंग ७ | Tukaram Gatha - Abhang 7

तुकाराम गाथा अभंग ७ - [Tukaram Gatha - Abhang 7] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

वाळो जन मज म्हणोत शिंदळी ।
परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥

सांडूनि लौकिक जालियें उदास ।
नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥

नाइकें वचन बोलतां या लोकां ।
म्हणे जालों तुका हरिरता ॥३॥संत तुकाराम महाराज