तुकाराम गाथा - अभंग ६९

प्रकाशन: संपादक मंडळ | २२ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ६९ | Tukaram Gatha - Abhang 69

तुकाराम गाथा अभंग ६९ - [Tukaram Gatha - Abhang 69] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

आशाबद्ध जन ।
काय जाणे नारायण ॥१॥

करी इंद्रियांची सेवा ।
पाहे आवडीचा हेवा ॥ध्रु॥

भ्रमलें चावळे ।
तैसें उचित न कळे ॥२॥

तुका म्हणे विषें ।
अन्न नाशियलें जैसें ॥३॥संत तुकाराम महाराज