तुकाराम गाथा - अभंग ६८

प्रकाशन: संपादक मंडळ | २१ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ६८ | Tukaram Gatha - Abhang 68

तुकाराम गाथा अभंग ६८ - [Tukaram Gatha - Abhang 68] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

पवित्र सोंवळीं ।
एक तींच भूमंडळीं ॥१॥

ज्यांचा आवडता देव ।
अखंडित प्रेमभाव ॥ध्रु॥

तींच भाग्यवंतें ।
सरतीं पुरतीं धनवित्तें ॥२॥

तुका म्हणे देवा ।
त्यांची केल्या पावे सेवा ॥३॥संत तुकाराम महाराज