तुकाराम गाथा - अभंग ६७

प्रकाशन: संपादक मंडळ | २० ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ६७ | Tukaram Gatha - Abhang 67

तुकाराम गाथा अभंग ६७ - [Tukaram Gatha - Abhang 67] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती ।
जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥१॥

भाडेकरी वाहे पाठीवरी भार ।
अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ध्रु॥

देवपूजेवरी ठेवूनियां मन ।
पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥२॥

तुका म्हणे फळ चिंतिती आदरें ।
लाघव हे चार शिंदळीचे ॥३॥संत तुकाराम महाराज