तुकाराम गाथा - अभंग ६६

प्रकाशन: संपादक मंडळ | १९ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ६६ | Tukaram Gatha - Abhang 66

तुकाराम गाथा अभंग ६६ - [Tukaram Gatha - Abhang 66] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

दुर्जनासि करी साहे ।
तो ही दंड हे लाहे ॥१॥

शिंदळीच्या कुंटणी वाटा ।
संग खोटा खोट्याचा ॥ध्रु॥

येर येरा कांचणी भेटे ।
आगी उठे तेथूनी ॥२॥

तुका म्हणे कापूं नाकें ।
पुढें आणिकें शिकविती ॥३॥संत तुकाराम महाराज