तुकाराम गाथा - अभंग ६४

प्रकाशन: संपादक मंडळ | १७ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ६४ | Tukaram Gatha - Abhang 64

तुकाराम गाथा अभंग ६४ - [Tukaram Gatha - Abhang 64] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल ।
खाऊं नये मूल आवडतें ॥१॥

मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद ।
यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥

कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम ।
तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥३॥संत तुकाराम महाराज