तुकाराम गाथा - अभंग ६२

प्रकाशन: संपादक मंडळ | १५ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ६२ | Tukaram Gatha - Abhang 62

तुकाराम गाथा अभंग ६२ - [Tukaram Gatha - Abhang 62] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

शुद्धबीजा पोटीं ।
फळें रसाळ गोमटीं ॥१॥

मुखीं अमृताची वाणी ।
देह वेचावा कारणीं ॥ध्रु॥

सर्वांगीं निर्मळ ।
चित्त जैसें गंगाजळ ॥२॥

तुका म्हणे जाती ।
ताप दर्शनें विश्रांती ॥३॥संत तुकाराम महाराज