तुकाराम गाथा - अभंग ६१
तुकाराम गाथा अभंग ६१ - [Tukaram Gatha - Abhang 61] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.
पराविया नारी माउलीसमान ।
मानिलिया धन काय वेचे ॥१॥न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष ।
काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु॥बैसलिये ठायी म्हणतां रामराम ।
काय होय श्रम ऐसें सांगा ॥२॥संताचे वचनीं मानितां विश्वास ।
काय तुमचें यास वेचे सांगा ॥३॥खरें बोलतां कोण लागती सायास ।
काय वेचे यास ऐसें सांगा ॥४॥तुका म्हणे देव जोडे याचसाठीं ।
आणीक ते आटी न लगे कांहीं ॥५॥संत तुकाराम महाराज