तुकाराम गाथा - अभंग ६०

प्रकाशन: संपादक मंडळ | १३ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ६० | Tukaram Gatha - Abhang 60

तुकाराम गाथा अभंग ६० - [Tukaram Gatha - Abhang 60] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

आम्ही सदैव सुडके ।
जवळीं येतां चोर धाके ।
जाऊं पुडी भिकें ।
कुतरीं घर राखती ॥१॥

नांदणूक ऐसी सांगा ।
नाहीं तरी वांयां भागा ।
थोरपण अंगा ।
तरी ऐसें आणावें ॥ध्रु॥

अक्षय साचार ।
केलें सायासांनी घर ।
एरंडसिंवार ।
दुजा भार न साहती ॥२॥

धन कण घरोघरीं ।
पोट भरे भिकेवरी ।
जतन तीं करी ।
कोण गुरें वासरें ॥३॥

जाली सकळ निश्चिंती ।
भांडवल शेण माती ।
झळझळीत भिंती ।
वृंदावनें तुळसीचीं ॥४॥

तुका म्हणे देवा ।
अवघा निरविला हेवा ।
कुटुंबाची सेवा ।
तोचि करी आमुच्या ॥५॥संत तुकाराम महाराज