तुकाराम गाथा - अभंग ६

प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २००५

तुकाराम गाथा - अभंग ६ | Tukaram Gatha - Abhang 6

तुकाराम गाथा अभंग ६ - [Tukaram Gatha - Abhang 6] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

गरुडाचें वारिकें कासे पितांबर ।
सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥

बरवया बरवंटा घनमेघ सांवळा ।
वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु॥

मुगुट माथां कोटि सूऱ्यांचा झळाळ ।
कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥

ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ ।
वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥

उद्धव अक्रूर उभे दोहींकडे ।
वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥

तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा ।
तोचि माझा सखा पांडुरंग ॥५॥संत तुकाराम महाराज