तुकाराम गाथा - अभंग ५६

प्रकाशन: संपादक मंडळ | ९ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ५६ | Tukaram Gatha - Abhang 56

तुकाराम गाथा अभंग ५६ - [Tukaram Gatha - Abhang 56] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

तेलनीशीं रुसला वेडा ।
रागें कोरडें खातो भिडा ॥१॥

आपुलें हित आपण पाही ।
संकोच तो न धरी कांहीं ॥ध्रु॥

नावडे लोकां टाकिला गोहो ।
बोडिले डोकें सांडिला मोहो ॥२॥

शेजारणीच्या गेली रागें ।
कुत्ऱ्यांनी घर भरिलें मागें ॥३॥

पिसारागें भाजिलें घर ।
नागविलें तें नेणे फार ॥४॥

तुका म्हणे वांच्या रागें ।
फेडिलें सावलें देखिलें जगें ॥५॥संत तुकाराम महाराज