तुकाराम गाथा - अभंग ५५

प्रकाशन: संपादक मंडळ | ८ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ५५ | Tukaram Gatha - Abhang 55

तुकाराम गाथा अभंग ५५ - [Tukaram Gatha - Abhang 55] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

महारासि सिवे ।
कोपे ब्राम्हण तो नव्हे ॥१॥

तया प्रायश्चित्त कांहीं ।
देहत्याग करितां नाहीं ॥ध्रु॥

नातळे चांडाळ ।
त्याचा अंतरीं विटाळ ॥२॥

ज्याचा संग चित्तीं ।
तुका म्हणे तो त्या याती ॥३॥संत तुकाराम महाराज