तुकाराम गाथा - अभंग ५४

प्रकाशन: संपादक मंडळ | ७ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ५४ | Tukaram Gatha - Abhang 54

तुकाराम गाथा अभंग ५४ - [Tukaram Gatha - Abhang 54] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

आहे तें सकळ कृष्णाचि अर्पण ।
न कळतां मन दुजें भावी ॥१॥

म्हणउनी पाठी लागतील भूतें ।
येती गवसीत पांचजणें ॥ध्रु॥

ज्याचे त्या वंचलें आठव न होतां ।
दंड या निमित्ताकारणें हा ॥२॥

तुका म्हणे काळें चेंपियेला गळा ।
मी मी वेळोवेळा करीतसे ॥३॥संत तुकाराम महाराज