तुकाराम गाथा - अभंग ५३

प्रकाशन: संपादक मंडळ | ६ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ५३ | Tukaram Gatha - Abhang 53

तुकाराम गाथा अभंग ५३ - [Tukaram Gatha - Abhang 53] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

सकळ चिंतामणी शरीर ।
जरी जाय अहंकार आशा समूळ ॥

निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि ।
निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥

मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी ।
येती तयापासीं अवघीं जनें॥

तीर्थांसी तीर्थ जाला तोचि एक ।
मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु॥

मन शुद्ध तया काय करिसी माळा ।
मंडित सकळा भूषणांसी ॥

हरीच्या गुणें गर्जताती सदा ।
आनंद तया मानसीं ॥२॥

तन मन धन दिलें पुरुषोत्तमा ।
आशा नाहीं कवणाची ॥

तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा ।
काय महिमा वर्णूं त्याची ॥३॥संत तुकाराम महाराज