तुकाराम गाथा - अभंग ५२

प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ५२ | Tukaram Gatha - Abhang 52

तुकाराम गाथा अभंग ५२ - [Tukaram Gatha - Abhang 52] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

माझिया मीपणा ।
जाला यावरी उगाणा ॥१॥

भोगी त्यागी पांडुरंग ।
त्यानें वसविलें अंग ॥ध्रु॥

टाळिलें निमित्त ।
फार थोडें घात हित ॥२॥

यावें कामावरी ।
तुका म्हणे नाहीं उरी ॥३॥संत तुकाराम महाराज