तुकाराम गाथा - अभंग ५१

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ५१ | Tukaram Gatha - Abhang 51

तुकाराम गाथा अभंग ५१ - [Tukaram Gatha - Abhang 51] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

आलिंगनें घडे ।
मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥

ऐसा संताचा महिमा ।
जाली बोलायाची सीमा ॥ध्रु॥

तीर्थे पर्वकाळ ।
अवघीं पायांपें सकळ ॥२॥

तुका म्हणे देवा ।
त्यांची केली पावे सेवा ॥३॥संत तुकाराम महाराज