तुकाराम गाथा - अभंग ५०

प्रकाशन: संपादक मंडळ | ३ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ५० | Tukaram Gatha - Abhang 50

तुकाराम गाथा अभंग ५० - [Tukaram Gatha - Abhang 50] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

हिरा ठेवितां ऐरणीं ।
वांचे मारितां जो घणीं ॥१॥

तोचि मोल पावे खरा ।
करणीचा होय चुरा ॥ध्रु॥

मोहरा होय तोचि अंगें ।
सूत न जळे ज्याचे संगें ॥२॥

तुका म्हणे तोचि संत ।
सोसी जगाचे आघात ॥३॥संत तुकाराम महाराज