तुकाराम गाथा - अभंग ५

प्रकाशन: संपादक मंडळ| १९ जून २००५

तुकाराम गाथा - अभंग ५ | Tukaram Gatha - Abhang 5

तुकाराम गाथा अभंग ५ - [Tukaram Gatha - Abhang 5] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

कर कटावरी तुळशीच्या माळा ।
ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥

ठेविले चरण दोन्ही विटेवरी ।
ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु॥

कटीं पितांबर कास मिरवली ।
दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥

गरुडपारावरी उभा राहिलासी ।
आठवें मानसीं तेंचि रूप ॥३॥

झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां ।
येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥

तुका म्हणे माझी पुरवावी आस ।
विनंती उदास करूं नये ॥५॥संत तुकाराम महाराज