तुकाराम गाथा - अभंग ४९

प्रकाशन: संपादक मंडळ | २ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ४९ | Tukaram Gatha - Abhang 49

तुकाराम गाथा अभंग ४९ - [Tukaram Gatha - Abhang 49] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

जन विजन जालें आम्हां ।
विठ्ठलनामा प्रमाणें ॥१॥

पाहें तिकडे बापमाय ।
विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु॥

वन पट्टण एकभाव ।
अवघा ठाव सरता जाला ॥२॥

आठव नाहीं सुखदुःखा ।
नाचे तुका कौतुकें ॥३॥संत तुकाराम महाराज