तुकाराम गाथा - अभंग ४८

प्रकाशन: संपादक मंडळ | १ ऑगस्ट २००५

तुकाराम गाथा - अभंग ४८ | Tukaram Gatha - Abhang 48

तुकाराम गाथा अभंग ४८ - [Tukaram Gatha - Abhang 48] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

निंदी कोणी मारी ।
वंदी कोणी पूजा करी ॥१॥

मज हें ही नाहीं तें ही नाहीं ।
वेगळा दोहीं पासुनी ॥ध्रु॥

देहभोग भोगें घडे ।
जें जें जोडे तें बरें ॥२॥

अवघें पावे नारायणीं ।
जनार्दनीं तुक्याचें ॥३॥संत तुकाराम महाराज