तुकाराम गाथा - अभंग ४७

प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग ४७ | Tukaram Gatha - Abhang 47

तुकाराम गाथा अभंग ४७ - [Tukaram Gatha - Abhang 47] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

आम्ही जरी आस ।
जालों टाकोनि उदास ॥१॥

आतां कोण भय धरी ।
पुढें मरणाचें हरि ॥ध्रु॥

भलते ठायीं पडों ।
देह तुरंगीं हा चढो ॥२॥

तुमचें तुम्हांपासीं ।
आम्ही आहों जैसीं तैसीं ॥३॥

गेले मानामान ।
सुखदुःखाचें खंडन ॥४॥

तुका म्हणे चित्तीं ।
नाहीं वागवीत खंती ॥५॥संत तुकाराम महाराज