तुकाराम गाथा - अभंग ४६

प्रकाशन: संपादक मंडळ | ३० जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग ४६ | Tukaram Gatha - Abhang 46

तुकाराम गाथा अभंग ४६ - [Tukaram Gatha - Abhang 46] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥

ऐका जी तुम्ही भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ॥ध्रु॥

कोणा ही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥

तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥संत तुकाराम महाराज