तुकाराम गाथा - अभंग ४५

प्रकाशन: संपादक मंडळ | २९ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग ४५ | Tukaram Gatha - Abhang 45

तुकाराम गाथा अभंग ४५ - [Tukaram Gatha - Abhang 45] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

दुजें खंडे तरी ।
उरला तो अवघा हरि ।
आपणाबाहेरी ।
न लगे ठाव धुंडावा ॥१॥

इतुलें जाणावया जाणा ।
कोंडें तरी मनें मना ।
पारधीच्या खुणा ।
जाणतेंचि साधावे ॥ध्रु॥

देह आधीं काय खरा ।
देहसंबंधपसारा ।
बुजगावणें चोरा ।
रक्षणसें भासतें ॥२॥

तुका करी जागा ।
नको चाचपूं वाउगा ।
आहेसि तूं आगा ।
अंगीं डोळे उघडी ॥३॥संत तुकाराम महाराज