तुकाराम गाथा - अभंग ४४
तुकाराम गाथा अभंग ४४ - [Tukaram Gatha - Abhang 44] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.
ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे ।
बळिये आम्ही भले शरणागत ॥१॥कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ ।
जाला पद्मनाभ सेवाॠणी ॥ध्रु॥कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं ।
इच्छेचिये वाही वरुषावे ॥२॥बैसलिये ठायीं लागलें भरतें ।
त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ॥३॥हरि नाहीं आम्हां विष्णुदासां जगीं ।
नारायण अंगीं विसावला ॥४॥तुका म्हणे बहु लाटे हें भोजन ।
नाहीं रिता कोण राहत राहों ॥५॥संत तुकाराम महाराज