तुकाराम गाथा - अभंग ४३

प्रकाशन: संपादक मंडळ | २७ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग ४३ | Tukaram Gatha - Abhang 43

तुकाराम गाथा अभंग ४३ - [Tukaram Gatha - Abhang 43] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

धर्माची तूं मूर्ती ।
पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥

मज सोडवीं दातारा ।
कर्मापासुनि दुस्तरा ॥ध्रु॥

करिसी अंगीकार ।
तरी काय माझा भार ॥२॥

जिवींच्या जीवना ।
तुका म्हणे नारायणा ॥३॥संत तुकाराम महाराज