तुकाराम गाथा - अभंग ४२

प्रकाशन: संपादक मंडळ | २६ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग ४२ | Tukaram Gatha - Abhang 42

तुकाराम गाथा अभंग ४२ - [Tukaram Gatha - Abhang 42] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

हरीच्या जागरणा ।
जातां कां रे नये मना ॥१॥

कोठें पाहासील तुटी ।
आयुष्य वेचे फुकासाटीं ॥२॥

ज्यांची तुज गुंती ।
ते तों मोकलिती अंतीं ॥२॥

तुका म्हणे बरा ।
लाभ काय तो विचारा ॥३॥संत तुकाराम महाराज