तुकाराम गाथा - अभंग ४१

प्रकाशन: संपादक मंडळ | २५ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग ४१ | Tukaram Gatha - Abhang 41

तुकाराम गाथा अभंग ४१ - [Tukaram Gatha - Abhang 41] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

अवगुणांचे हातीं ।
आहे अवघी फजिती ॥१॥

नाहीं पात्रासवें चाड ।
प्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु॥

विष तांब्या वाटी ।
भरली लावूं नये होटीं ॥२॥

तुका म्हणे भाव ।
शुद्ध बरा सोंग वाव ॥३॥संत तुकाराम महाराज