तुकाराम गाथा - अभंग ४०

प्रकाशन: संपादक मंडळ | २४ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग ४० | Tukaram Gatha - Abhang 40

तुकाराम गाथा अभंग ४० - [Tukaram Gatha - Abhang 40] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

देवाच्या प्रसादें करा रे भोजन ।
व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥१॥

ब्रम्हादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट ।
नका मानूं वीट ब्रम्हरसीं ॥ध्रु॥

अवघियां पुरतें वोसंडलें पात्र ।
अधिकार सर्वत्र आहे येथें ॥२॥

इच्छादानी येथें वळला समर्थ ।
अवघेंचि आर्त पुरवितो ॥३॥

सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं ।
पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥४॥

तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें ।
कामारीसांगातें निरूपम ॥५॥संत तुकाराम महाराज