तुकाराम गाथा - अभंग ३९

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग ३९ | Tukaram Gatha - Abhang 39

तुकाराम गाथा अभंग ३९ - [Tukaram Gatha - Abhang 39] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

जेविले ते संत मागें उष्टावळी ।
अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥१॥

सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा ।
पासुनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ध्रु॥

परें परतें मज न लागे सांगावें ।
हें तों देवें बरें शिकविलें ॥२॥

दुसर्‍यातें आम्ही नाहीं आतळत ।
जाणोनि संकेत उभा असे ॥३॥

येथें कोणीं कांहीं न धरावी शंका ।
मज चाड एका भोजनाची ॥४॥

लांचावला तुका मारितसे झड ।
पुरविलें कोड नारायणें ॥५॥संत तुकाराम महाराज