तुकाराम गाथा - अभंग ३८

प्रकाशन: संपादक मंडळ | २२ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग ३८ | Tukaram Gatha - Abhang 38

तुकाराम गाथा अभंग ३८ - [Tukaram Gatha - Abhang 38] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी ।
पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥१॥

अमूप हे गांठीं बांधूं भांडवल ।
अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥ध्रु॥

अवघे होती लाभ एका या चिंतनें ।
नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥२॥

जन्ममरणाच्या खुंटतील खेपा ।
होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥३॥

गेले पुढें त्यांचा शोधीत मारग ।
चला जाऊं माग घेत आम्ही ॥४॥

तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा ।जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥५॥संत तुकाराम महाराज