तुकाराम गाथा - अभंग ३७

प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग ३७ | Tukaram Gatha - Abhang 37

तुकाराम गाथा अभंग ३७ - [Tukaram Gatha - Abhang 37] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

पावलें पावलें तुझें आम्हां सर्व ।
दुजा नको भाव होऊं देऊं ॥१॥

जेथें तेथें तुझींच पाउलें ।
त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु॥

भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद ।
आम्हां नको वाद त्यांशीं देऊं ॥२॥

तुका म्हणे अणु तुजविण नाहीं ।
नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥३॥संत तुकाराम महाराज