तुकाराम गाथा - अभंग ३५

प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग ३५ | Tukaram Gatha - Abhang 35

तुकाराम गाथा अभंग ३५ - [Tukaram Gatha - Abhang 35] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

अंतरींची घेतो गोडी ।
पाहे जोडी भावाची ॥१॥

देव सोयरा देव सोयरा ।
देव सोयरा दीनाचा ॥ध्रु॥

आपुल्या वैभवें ।
शृंगारावें निर्मळ ॥२॥

तुका म्हणे जेवी सवें ।
प्रेम द्यावें प्रीतीचें ॥३॥संत तुकाराम महाराज