तुकाराम गाथा - अभंग ३४

प्रकाशन: संपादक मंडळ | १८ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग ३४ | Tukaram Gatha - Abhang 34

तुकाराम गाथा अभंग ३४ - [Tukaram Gatha - Abhang 34] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

आपुलिया हिता जो असे जागता ।
धन्य माता पिता तयाचिया ॥१॥

कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक ।
तयाचा हरीख वाटे देवा ॥ध्रु॥

गीता भागवत करिती श्रवण ।
आणीक चिंतन विठोबाचें ॥२॥

तुका म्हणे मज घडो त्याची सेवा ।
तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥संत तुकाराम महाराज