तुकाराम गाथा - अभंग ३३

प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग ३३ | Tukaram Gatha - Abhang 33

तुकाराम गाथा अभंग ३३ - [Tukaram Gatha - Abhang 33] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

सावध जालों सावध जालों ।
हरीच्या आलों जागरणा ॥१॥

तेथें वैष्णवांचे भार ।
जयजयकार गर्जतसे ॥ध्रु॥

पळोनियां गेली झोप ।
होतें पाप आड तें ॥२॥

तुका म्हणे त्या ठाया ।
ओल छाया कृपेची ॥३॥संत तुकाराम महाराज