तुकाराम गाथा - अभंग ३२

प्रकाशन: संपादक मंडळ | १६ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग ३२ | Tukaram Gatha - Abhang 32

तुकाराम गाथा अभंग ३२ - [Tukaram Gatha - Abhang 32] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

नये जरी तुज मधूर उत्तर ।
दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥

नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल ।
येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु॥

देवापाशीं मागें आवडीची भक्ति ।
विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥

तुका म्हणे मना सांगतों विचार ।
धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥संत तुकाराम महाराज