तुकाराम गाथा - अभंग ३

प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जून २००५

तुकाराम गाथा - अभंग ३ | Tukaram Gatha - Abhang 3

तुकाराम गाथा अभंग ३ - [Tukaram Gatha - Abhang 3] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥

गोड तुझें रूप गोड तुझें नाम ।
देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु॥

विठो माउलिये हाचि वर देईं ।
संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥

तुका म्हणे कांहीं न मागे आणीक ।
तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥संत तुकाराम महाराज