तुकाराम गाथा - अभंग २७

प्रकाशन: संपादक मंडळ | ११ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग २७ | Tukaram Gatha - Abhang 27

तुकाराम गाथा अभंग २७ - [Tukaram Gatha - Abhang 27] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

आहांच वाहांच आंत वरी दोन्ही ।
न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥

भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा ।
आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥

तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी ।
नव्हे हे करणी भलतीची ॥३॥संत तुकाराम महाराज