तुकाराम गाथा - अभंग २२

प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग २२ | Tukaram Gatha - Abhang 22

तुकाराम गाथा अभंग २२ - [Tukaram Gatha - Abhang 22] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

आजिवरी तुम्हां आम्हां नेणपण ।
कौतुकें खेळणें संग होता ॥१॥

आतां अनावर जालें अगुणाची ।
करूं नये तेंचि करीं सुखें ॥२॥

तुका म्हणे आतां बुडविलीं दोन्ही ।
कुळें एक मनीं नारायण ॥३॥संत तुकाराम महाराज