तुकाराम गाथा - अभंग २१

प्रकाशन: संपादक मंडळ | ५ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग २१ | Tukaram Gatha - Abhang 21

तुकाराम गाथा अभंग २१ - [Tukaram Gatha - Abhang 21] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

सांगतों तें तुम्हीं ऐकावें कानीं ।
आमुचे नाचणीं नाचूं नका ॥१॥

जोंवरी या तुम्हां मागिलांची आस ।
तोंवरी उदास होऊं नका ॥२॥

तुका म्हणे काय वांयांविण धिंद ।
पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥३॥संत तुकाराम महाराज