तुकाराम गाथा - अभंग २०

प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग २० | Tukaram Gatha - Abhang 20

तुकाराम गाथा अभंग २० - [Tukaram Gatha - Abhang 20] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी ।
मज आणि हरी वियोग तों ॥१॥

प्रसंगीं या नाहीं देहाची भावना ।
तेथें या वचना कोण मानी ॥२॥

तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत ।
दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥३॥संत तुकाराम महाराज