तुकाराम गाथा - अभंग २

प्रकाशन: संपादक मंडळ | २ फेब्रुवारी २००८

तुकाराम गाथा - अभंग २ | Tukaram Gatha - Abhang 2

तुकाराम गाथा अभंग २ - [Tukaram Gatha - Abhang 2] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनियां ॥१॥

तुळसीहार गळां कांसे पितांबर ।
आवडे निरंतर तेंचि रूप ॥ध्रु॥

मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥

तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥संत तुकाराम महाराज