तुकाराम गाथा - अभंग १९

प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग १९ | Tukaram Gatha - Abhang 19

तुकाराम गाथा अभंग १९ - [Tukaram Gatha - Abhang 19] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मजसवें आतां येऊं नका कोणी ।
सासुरवासिनी बाइयानो ॥१॥

न साहवे तुम्हां या जनाची कूट ।
बोलती वाईट ओखटें तें ॥२॥

तुका म्हणे जालों उदास मोकळ्या ।
विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥३॥संत तुकाराम महाराज