तुकाराम गाथा - अभंग १७

प्रकाशन: संपादक मंडळ | १ जुलै २००५

तुकाराम गाथा - अभंग १७ | Tukaram Gatha - Abhang 17

तुकाराम गाथा अभंग १७ - [Tukaram Gatha - Abhang 17] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

एका जिवें आतां जिणें जालें दोहीं ।
वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥१॥

नारायणा आम्हां नाहीं वेगळीक ।
पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥

तुका म्हणे जालें सायासाचें फळ ।
सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥संत तुकाराम महाराज